STORYMIRROR

Ashita Chitnis

Abstract

4  

Ashita Chitnis

Abstract

संवेदना

संवेदना

1 min
249

पाण्याच्या थेंबाला काय माहीत

तहानेतील व्याकुळता

त्यासाठी चातकाचा जन्म हवा

बर्फाच्या कणाला काय माहीत

रखरखीत वाळवंटातील दाहकता

त्यासाठी निवडुंगाचा सदरा हवा

गोऱ्या कांतीला काय माहीत

सावळ्या रंगातील सुंदरता

त्यासाठी गालावर तीळ हवा

उघड्या डोळ्यांना काय माहीत

मिटलेल्या डोळ्यांमागची भयाणता

त्यासाठी गांधारीचा पण हवा

चकचकीत बुटांना काय माहीत

अनवाणी पायातील अगतिकता

त्यासाठी वारकऱ्याचा भाव हवा

परतीच्या जीवाला काय माहीत

जन्मलेल्या जीवाची आतुरता

त्यासाठी ममतेचा स्पर्श हवा

मोकळ्या हातांना काय माहीत

जोडलेल्या हातातील आस्तिकता

त्यासाठी दगडाला शेंदूर हवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract