STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

4  

Rohit Khamkar

Abstract

झेंडा वंदन

झेंडा वंदन

1 min
1.0K

विविध भाषा अनेक वेष, सर्वधर्म समभाव इरादा नेक.

वेगळे असून धर्म जात पंत, वंदन झेंड्या करण्या आले एक.


त्या दिवशीही सगळ सारखच, अगदी पूर्वीप्रमाणेच होते.

ओठांवर भाषा वेगळ्या होत्या, परी भारत मातेच्या जयजयकाराचे नारे होते.



आजही आमचे पोषाख, आमची ओळख सांगत होते.

झूकले जिथे सगळ्यांचे शिश, ते निशाण तिरंगा होते.



जिथे सगळ वैर संपते, एकत्र आणते ती देशभक्ती.

कुठेही राष्ट्रगीत ऐकू आले की, स्तब्ध होतात करोडो व्यक्ती.



नांदतो आम्ही तिरंग्याच्या सावलीत, मान आणी सन्मानाने.

धर्म कोणताही असो, कर्म करतो देशभक्तीच्या जबाबदारीने.



डोळे स्थिर मन शांत होते, अवाढव्य सोहळा पाहून.

लहान थोर सगळे येतात, जातात झेंडा वंदन न्हाऊन.



अभिमानाने छाती पूलते, स्वतंत्र दिनाच्या या दिवशी.

उपकार आईचे हक्क मिळाला, नागरिकत्व आहे भारतदेशी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract