STORYMIRROR

Ankit Navghare

Abstract Inspirational

4  

Ankit Navghare

Abstract Inspirational

भेटले का कुणी

भेटले का कुणी

1 min
22.2K

सारेच दुनियादार होते या दुनियेत 

माझे म्हणुनी मला भेटले का कुणी


फक्तच चौकशी केली भेटल्यावर तितकी

आपुलकीने घरी ये मला म्हटले का कुणी 


रात्री वादळ उठे विचारांचे झोपताना 

शांतपणे डोळे माझे मिटले का कुणी 


चारायला घास दुसऱ्याला भरल्या 

ताटावरुनी तरी उठले का कुणी 


सारे टिमटिमणारे दिवे होते चोहीकडे

शोधतो मशाल बनुनी पेटले का कुणी 


स्वत:चे खिसे भरण्यात व्यस्त सारे

मग कुण्या परक्यासाठी झटले कुणी


तर फक्तच चालला होता खेळ सर्कशीचा

मग या सर्कशीतून तरी सुटले का कुणी 


काय भरवसा मरण येईल कुठल्या क्षणी 

तरीही असेल जीवना मी तुझा सदैव ऋणी    


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract