उद्या काय
उद्या काय


आजसारखाच असेल का उद्या की
उद्या काही वेगळे काही घडेल का
"का देव नाही आला मद्तीला" याचिका
घेऊन कुणी कोर्टाची पायरी चढेल का
जोडताना काही ऋणानुबंध नवे
कुणी कधी जुने नाते तोडेल का
असतील सगेसोयरे सोबतीला तरी
एकट्यात बसून कुणी रडेल का
उडून जातील जेव्हा घरट्यातील पाखरे
चोहिकडे कुणावाचून कुणाचे अडेल का
जिंदगी जगले जितक्या उत्साहात
तसे मृत्युचे दार कोणी उघडेल का
जगताना भलेही केले सारेच शौक पुरे पण
मरताना माझे सुंदर चित्र कुणी काढेल का