असे नाही
असे नाही
1 min
96
सुखावलो थोडा म्हणजे मी
कुणाला भेटलो असे नाही
डोळ्यात आसवे म्हणजे मी
केव्हातरी तुटलो असे नाही
ठिणगी पडलीच म्हणजे मी
आत्ताच पेटलो असे नाही
पाहिले एक स्वप्न म्हणजे मी
डोळे माझे मिटलो असे नाही
दुषणे दिली त्यांनी म्हणजे मी
दुनियेतुनी उठलो असे नाही
