STORYMIRROR

Ankit Navghare

Inspirational

3  

Ankit Navghare

Inspirational

एकतरी बहिण दे

एकतरी बहिण दे

1 min
191

रडलो मी जेव्हा तेव्हा आसवे माझे पुसण्यासाठी

कितीही बेकार जोक असला तरीपण हसण्यासाठी


चुकलो जिथे तिथे हक्काने मग रागावण्यासाठी

महाभारतातल्या अर्जुनासारखं मला वागवण्यासाठी


रक्षाबंधनाला स्वतः लाडु करुन मला भरविण्यासाठी

वाईट मार्गाला लागलो तर जीवनाची अद्दल घडवण्यासाठी


नेहमी बोट धरुन सोबत माझ्यातला मी दाखवण्यासाठी

आणि कळत नकळत मला खूप काही शिकवण्यासाठी


विषयांच्या आसक्तीमधून मला मुक्त करण्यासाठी

जिंकता जिंकता युद्धात सारे काही हरण्यासाठी


असावी कधी हसवण्यासाठी तर कधी रडवण्याची 

कधी मोहमायेत फसवण्यासाठी कधी चिडवण्यासाठी 


माहित आहे ती सोबत असली तर मरण मला येणार नाही 

नेहमी म्हणायची न मी तुला एकटं कधी सोडून जाणार नाही 


हे भगवंता, हे परमेश्वरा, मला अशी एकतरी बहिण दे

आणि नसेल मोठी तुझ्याकडे तर मग एखादी लहान दे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational