मी आणी ही दुनिया
मी आणी ही दुनिया

1 min

139
गर्दि लोकांची शोधतो मी त्यात
मिळते का क्षणभर एकांत कुठे
चालतो कल्लोळ भावनांचा मी
शोधतो मिळतो का निवांत कुठे
सदा घोंगावत दृष्ट वारा तो मग
कधीतरी होईल का शांत कुठे
दुनियेत या जगण्याची ठरवलेली
चौकटि पण त्याची मला भ्रांत कुठे
माझ्यातुन कवितेचा कि कवितेतुन
माझा झालेला हा मग उत्क्रांत कुठे
हरवलाय माझ्यातला मी, शोधतोय
सारीकडे तो मिळतो का आज कुठे