STORYMIRROR

Ankit Navghare

Tragedy

3  

Ankit Navghare

Tragedy

भोंगळा कारभार

भोंगळा कारभार

1 min
617

चिरडली कळी, वासनेचा बळी

न्यायाची प्रतीक्षा, वर्षांनी शिक्षा


ओसाड गावे, शहराकडे लोंढे

कुठे भर रस्त्यावर रक्त सांडे


फडकले झेंडे, रंगांसाठी भांडे

देवाला माणसे गाभाऱ्यात कोंडे


पक्ष विपक्ष ते सारे तिरपे अक्ष

जनतेकडे असे कुणाचे लक्ष 


कुणा हाताला काम, दिसभर घाम

शेतकरी मालाला नाही मिळे दाम


महापुरुषांना जातींमध्ये घेई वाटून

बोध न घे, करी जयंती नटुनथटुन

 

पैशासाठी रांगेत तडफडे म्हातारा

साहेबाच्या खोलीत येई थंड वारा


मतांसाठी घरोघरी नेते हात जोडे

निवडून आल्यावरी ते लचके तोडे 


भोंगळा कारभार होई भुईला भार

तिरडी उचली शेवटी माणसे चार

 

काय चालले कोण करी विचार

सारे चालवी इथे आपुले घरदार


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy