जात गेली
जात गेली

1 min

117
होतेच एक झोपडे
मोडुनी जात गेली
माणसातला माणुस
फोडुनी जात गेली
लचके माणसांचेच
तोडुनी जात गेली
पांघरून ते रुढींचे
ओढुनी जात गेली
शिक्का कपाळी कधी
खोडुनी जात गेली
शेवटी चितेवर मला
सोडुनी जात गेली