STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

4  

Sanjay Raghunath Sonawane

Tragedy

दुबळा शेतकरी

दुबळा शेतकरी

1 min
41.4K


अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खडतर झाले रे

भाकरीसाठी राबतोय मी

भाकर पोटाला नाही रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खड़तर झाले रे


काळ्या आईकडे बघून सारा

जीव माझा जळतोय रे

कसता ,कसता मातीत सारे

आयुष्य माझे झिजले रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खड़तर झाले रे


मेहनत रात्र, दिनाची माझी

व्यर्थ अशीच गेली रे

काळ्या आईकडे बघून माझे

काळीज सारे तुटते रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खड़तर झाले रे


पोटासाठी जीव माझा

मातीत सारा ओतलाय रे

खऱ्या घामाचे मोल माझे

फिटता, फिटत नाही रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खडतर झाले रे


म्हातारपनी नाही आधार कुणाचा

शरीर खितपत पडते रे

औषध पाण्यावाचून जीव

तडफडत, तळमळत पडतोय रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खड़तर झाले रे



जीव जात नाही म्हणून मी

उगाच जीवन जगतोय रे

काळ्या आईच्या समाधानासाठी

जीवन संघर्ष करतोय रे

अल्पभूधारक शेतकरी मी

जगणे खडतर झाले रे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy