STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

माझे तुझ्यावर प्रेम

माझे तुझ्यावर प्रेम

1 min
570

माझे तुझ्यावर प्रेम आहे 

बोलणे खूप सोपे असते 

भावनांच्या आहारी जाऊन 

ते सतत मनाशी संघर्ष करते  


आयुष्यात शब्दाचे वचन पाळणारे 

खूप कमी दिसतात 

शब्दांना निभावणारे क्वचितच असतात 

प्रेमी युगल प्रेमाच्या खोट्या थोतांडापायी 

विरहात झुरताना आढळतात  


माझे तुझ्यावर प्रेम आहे 

हे एक शब्दाचे तप आहे 

कष्टाच्या घामातून सतत

ते उजाळत आहे  


यात प्रत्येक यशस्वी होत नाही 

प्रेम लगेच कुणावरही होत नाही 

ते कर्तृत्वाने सिद्ध करायचे आहे 

प्रेमभंगानंतर विरहाचे दुर्लक्ष 

पचवायला शिकले पाहिजे आहे 


लगेच विसरुन दुर्लक्ष करायचे आहे 

माझे तुझ्यावर प्रेम आहे 

हे सत्यात उतरावे लागते 

सत्याचे रूपांतर नेहमी 

कृतीत दिसायला असते  


विश्वासाच्या पातळीवर उंच शिखर 

सर करायचे असते  

आयुष्यभर साथ देऊन 

माझे तुझ्यावर प्रेम आहे 

हे नेहमी संसारात बोलायचे असते


साहित्याला गुण द्या
लॉग इन