STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

4  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

स्वच्छतेचे भारुड

स्वच्छतेचे भारुड

1 min
781

अगं, अगं सखू

गाजावाजा झाला, गाजावाजा झाला

कशाचा हो धनी?

सारा गाव गोळा झाला 

स्वच्छतेचा डांगोरा पिटला 

फोटो काढून सायबाला पाठवला 

दुसऱ्या दिवशी साऱ्या रस्त्याला हागणदरीयुक्त गाव दिसला 

तात्पुरता देखावा केला 

हागणदरीचा फोटो नाही गेला

चमकोगिरीचा सोहळा पार पडला


(काय म्हणता धनी?

हो, हो खरे आहे, खरे आहे

आदल्या दिवशी स्वच्छतेचा फोटो असतो.

दुसऱ्या दिवशी परत घाण साचलेली दिसते)


मग काय करायचे आपण?

नको फोटो, नको प्रसिद्धी, आपल्याला 

स्वच्छ करू आपल्या साऱ्या गावाला 

गाडगे महाराजांचे विचार अनुयायी आपण 

कृतीत आणू आपण स्वच्छतेला 

गावागावात आपण फिरू 

शाळाशाळांत आपण फिरू 

स्वतः हातात झाड़ू घेऊ 

नंतर जगाला उपदेश करू 

स्वच्छतेचा संदेश देऊ 

तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे नेऊ 

बापूजींचे स्वप्न साकार आपण करू 


(खरे खरे आहे धनी, फोटो काढून एक

दिवसाचा देखावा नको. हे काम

दररोज खेड्यातून, शहरातून झाले पाहिजे)


आपला गाव स्वच्छ आपण करू या 

अंतकाळजातून इच्छा बाळगू या 

सारे गावकरी एकत्र या रे 

हागणदरीमुक्त गाव करा रे 

प्रत्येकाला शौचालय द्या रे 

हागणदरीमुक्त गाव करा रे 


(खरोखर धनी, याला म्हणतात स्वच्छता अभियान 

त्यात नसावा मानापानाचा, आदर आणि सन्मान 

सेवक म्हणून करावा आपला कष्टाचा सन्मान)



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational