STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Classics

3  

Sanjay Raghunath Sonawane

Classics

एक अश्रू-कविता

एक अश्रू-कविता

1 min
1.1K


तू हुंदके देऊन रडत होतीस 

तुझ्या शब्दांना वाचा फोडत होतीस 


तेव्हा माझे अश्रू ही दुःखात बुडाले होते 

तेवढ्याच वेदनेने व्याकुळ झाले होते 


तुझे अश्रू गालावरून ठिपकत होते 

खऱ्या प्रेमाची साक्ष कायम देत होते 


माझे अश्रू हृदयातून पाझरत होते 

दोन जीवांचे अतूट दुःख होते 


तिचे अश्रू मोत्यासारखे चमकत होते 

त्याचे अश्रू अदृष्य होते, खूप काही सांगत होते 


एकमेकांच्या प्रेमाचा असावा एक दुसऱ्यास भरोसा 

पैस्यांपेक्षा जास्त जपावा काळजाचा वसा 


तू प्रेमाने बोलल्यास जाईल त्याचा थकवा 

तुझ्या शब्दांच्या जादूने मिळेल त्याला विसावा 


तुझ्या काळजाचाच आहे तो एक भाग 

अनमोल शब्दाच्या श्रृंगाराने जातो शिणभाग 


तुझ्या त्या नाजूक डोळ्यांत खूप काही दिसत होते 

भाव मनाचे सर्व काही सांगून जात होते  


एकाने झाले जरी दाहक एकाने व्हावे जल 

आनंदी जीवनात राग विसरून व्हावे एक दिल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics