Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kailas Kokate

Classics

1.0  

Kailas Kokate

Classics

नटसम्राट

नटसम्राट

1 min
13.8K


सूर्य, चंद्र, ताऱ्या नी सदा प्रकाशमय,

    मृगजळताही भासे सूर, ताल आणि लय..

वृक्ष वेली नद्यांचे मधुर सान्निध्य,

    व्यक्ती तितक्याच प्रकृतीचे वैविध्य..

गगनात इंद्रधनुष्याच्या सप्त रंगसंगती,

    क्षितिजालागून धरतीशी रंगमंच अवतरती..

आईच्या गर्भाइतकी सुरक्षितता तिचे ठायी,

    या पृथ्वी सम उत्कृष्ट रंगमंच होणे नाही..


डोंगरावरच्या नागमोडी वळणाची वाट,

     हिरव्यागार दाट झाडीतील अंधारी पहाट..

तरुण मनातील खडकाची अभेदता,

     थकलेल्या वृद्धपनातील नाना व्यथा..

या वाटेतील वळणे खूप घातक,

     जीवन म्हणजे बिनतिकिटाच नाटक..

आईची कुस ते मृत्यूच्या काळ्याशार डोही,

     जीवनप्रवासासम अप्रतिम नाटिका होणे नाही..


मुखावरील संवेदना जाणतसे अंत:करण,

      बहुरूपी कपटही अंगीकारते स्मित वंदन..

सैतानाची पिल्लं साधती भूमिका अनंत

     प्रयोग असली की नकली हीच खंत..

राग, रंग , भावरसाचे घडे उद्दीपण,

     सजीवतील नट करीतसे प्रसारण..

पराभवांच्या जखमा आणि विजया चे झेंडे लेई,

     मानवासम जगज्जेता नट होणे नाही..


पसरलेली देहभोगाची आंधळी दलदल,

     ऋतूची अवकळा त्यातला बदल..

मुलांनीच छळली चालती बोलती दैवते,

     रोगांच्या रूपाने उभी राहिली पापे..

तुळशी वृंदावनाचा घडला अपभ्रंश,

     अखेर मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला केला दंश..

निसर्ग बदलला यात गैर अजिबात नाही,

     अस घडवणाऱ्या विधात्यासम लेखक होणे नाही..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics