सावित्रीची लेक
सावित्रीची लेक
साज शृंगार करून परमात्म्याच्या सुंदर कलाकृतीच्या सुंदरतेला दाद देते ती स्त्री असते..
आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणाची राब राब राबते ती स्त्री असते..
जात्यावरील ओव्या गात गात गायन वादनात हातखंडा जमवते ती स्त्री असते..
आत्म्याचे परमात्म्याशी संगठण करून अध्यात्मिक संतपदाला पोहचते ती स्त्री असते..
झिम्मा फुगडी खेळता खेळता सतासमुद्रापल्याड क्रीडाविश्वात नाव कमावते ती स्त्री असते..
आपल्या बाळाला सांभाळताना स्वतः बालक होऊन जाते ती स्त्री असते..
हातात लेखणी घेऊन समाजप्रबोधन करते ती स्त्री असते..
घर परिसर स्वछ करता करता कुटुंबाचे अंतर्मन निर्मल बनवते ती स्त्री असते..
स्वतः शिक्षित असो व नसो अपत्यांना सुशिक्षित करण्याचा निर्धार मनी घेते ती स्त्री असते..
कौटुंबिक तिढा सोडवता सोडवता कधी कधी उत्कृष्ट न्यायाधीश होऊन जाते ती स्त्री असते..
आपल्या अर्भकाचे सर्व गुन्हे माफ करण्याइतपत माया जिच्या पोटी असते ती स्त्री असते..
घराच्या उंबरठ्यापर्यंत विश्व सांभाळता सांभाळता अंतराळात भरारी घेते ती स्त्री असते..
सर्वांची काळजी घेता घेता स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते ती स्त्री असते..
स्वतःचे कुटुंब संगोपन करता करता प्रसंगी हातात समशेर घेऊन सीमेवर क्षेत्ररक्षण करते ती स्त्री असते..
कुटुंबाचे ओझे डोक्यावरती झेलत झेलत घराचे मांगल्य जपते ती स्त्री असते..
स्त्री सर्व कला साधताना नवरसांची स्वामिनी होऊन जाते कारण ती "सावित्रीची लेक" असते..
