मृत्यू
मृत्यू
1 min
14.7K
जीवनरूपी वृक्षाला लागलेले गोड फळ,
हे फळ चाखायला मनी असावे बळ..
मृत्यू म्हणजे फेकून द्यावे जुने वस्त्र,
परतीच्या वाटेला निघावे लेवूनी धैर्यरूपी शस्त्र..
अनंतविश्वात होणारे हे महाप्रस्थान,
न रोखी याला आण, बाण अथवा शान..
मृत्यू म्हणजे दीर्घ महानिद्रेत जाण,
परमात्म्याशी पाप पुण्याची कबुली करणं..
मरणोत्तर तर असते जीवन अनंत,
सक्तीने अनासक्तीच धोरण यातच असत..
मृत्यू म्हणजे काळरुपी देवता,
यामुळेच लाभते संसाराला रमणीयता..
मागता जे मिळत नाही,
टाळता जे टळत नाही..
अस विश्वात आहे एकच सत्य,
मृत्यू हेच तर त्याच नाव असत..
