STORYMIRROR

Trupti Naware

Classics

4  

Trupti Naware

Classics

दिवा

दिवा

1 min
40.9K


 

दिवेलागणीचा दिवा

त्याची जळतानांची फडफड

लख्ख प्रकाशातही स्वतः ला

संपवण्याची तडफड

प्रकाशाला उर्जा मिळाली 

तेलाच्या मैञीची

वाटेत कोरडी राखच राहीली

कधीतरी संपणार्या मैञीची

तुटलेल्या वातीसोबत

भिती झाली अंधाराची

दिवेलागणीचा दिवा

त्याची महती ही सोज्वळ

शुभंकरोतीची आरती

घँटानादाची सोबत

स्पर्शासवे दुखावणारी

डोळ्यांना माञ सुखावणारी

धडपडणार्या प्रकाशालाही

अंधारात मग लाजवणारी

दिवेलागणीचा दिवा

त्याची भक्तीमय कळकळ

भगवंताला कळली

त्याची ज्योतही निर्मळ

लखलखत्या उजेडातली

दिव्यांची तारांबळ

अबोल होती वात

सोशीक होते तेल

पणतीही निरागस

भगवंताचीच ओढ

कदाचित् तिलाही निरंतर !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics