बहर
बहर
सगळ्या जुन्या कविता चाळताना
वसंत ऋतुत बहर आलेला गुलमोहर आठवला ..
वाटल.. म्हणजे यापूर्वी इतक्या तीव्रतेने
कधीच वाटल नव्हत ..
किती श्रीमंत आहे मी !!!
आत्मविश्वास म्हणा किंवा गर्व
शब्दांचा सुगंध तितकाच ताजा
प्रत्येक ओळीवरून हात फिरवताना
जणू बोलका खजिना असावा माझा..
जितका वाटला तितका वाढतच जातो
जितका नवीन रचला तितका फुलतच जातो
गुलमोहरासारखा ..........
सगळ्या जुन्या कविता चाळताना
प्रत्येक कविता नवीन होत गेली
त्यावेळेला ,,,त्याबद्दल ,,, तस तस लिहिलेल
स्वतःवरती कौतूकांच्या अक्षदांची
उधळण करत गेली .. .. ..
"जून ते सोन " म्हणतात या अर्थाची म्हण
प्रत्येक शब्दाला सोन करत गेली
म्हणूनच असेल कदाचित
मी श्रीमंत असल्याचा भास झाला
आणि जुन्या कविता चाळताना
एका नवीन कवितेला बहर आला !