हाती फक्त सुगंध होता
हाती फक्त सुगंध होता


अंतरातली माझ्या जाहली तृप्ती आता
जे नव्हते कधी माझे आले स्वप्नात माझ्या
संपल्या विझून आता मनात पेटलेल्या चिंता
हृदयात होतो दरवळ वाटेत रात्रीच्या येता
संध्या हसून गेली खेळ अंधाराचा सुरू होता
फांदीआडचा प्राजक्तही न्याहाळून बघत होता
स्पर्श सहानुभूतीचा भरवसा स्वप्नाचा नव्हता
फुलांच्या माळा इतक्या होत्या हाती फक्त सुगंध होता
स्वप्नापेक्षा तर सुखद रात्रीचा जागर होता
निजलेल्या बागेतही किमान सोबतीला चंद्र होता