जीवन
जीवन
परसातलं पुष्प
भ्रमराच्या स्पर्शान
भावनांच्या हिंदोळ्यावर
हळुवार डुलत असतं
जीवन अस जगायच असतं
उमेदीच्या पंखांवर
स्वप्नांच्या लाटांवर
पंख फैलावून
स्वच्छंदी मनान
बागडायच असतं
जीवन अस जगायच असतं
आयुष्य जगतांना
सोनेरी पहाटे
>
सुखद स्वप्नांना
उराशी बाळगायच असतं
जीवन अस जगायच असतं
गतकाळातल्या स्मृती
वर्तमानात जपत
भविष्याच चिंतन
करायच असतं
जीवन अस जगायच असतं
नैराश्याच्या गर्तेतून
स्वतःला सावरत
चैतन्याचा झरा
सतत जोपासत
जीवन नेहमी जगायच असतं