ऊशीखाली लपवलेले प्रेम
ऊशीखाली लपवलेले प्रेम
निरव शांततेत रात्री, ते उशीखाली लपवलेले,
ते प्रेम बाहेर येवून, मला जागे करुन गेले।।धृ।।
खरे सांगायचे तर, मैलोन्मैल चालून चालून थकले,
पण मी माझ्या जागेवर होते, हे आज उमगले।।१।।
ती मूक वेदना, राग अनुराग, वाट बघणे, ती हताशा,
तू न बोलावल्याची खंत, मी न आल्याची निराशा।।२।।
मी अोरडले, तक्रार केली तरी बाकी उरते उषा, आशा,
कदाचित सारे संपेल, शेवटची हाक मारेन तेव्हाशा।।३।।
तोपर्यंत वाहते सोबत, उशीखाली लपवलेले सारे,
अवेळी, कधीही बाहेर येवून मला जागे करणारे।।४।।