क्षण तुझ्या सहवासातले !
क्षण तुझ्या सहवासातले !
क्षण तुझ्या सहवासातले,
सरू नयेत से वाटते
मुग्ध तुझे बोलणे
विरू नये से वाटते
मंजुळ स्वर तुझे
कानी गुंजत वाहती
निलाक्षी नेत्र ते
नयनी दिसत राहती
दिल खुलास हास्य ते
मनी सतत तरळते
मद मस्त रूप देखणे
जणू ‘परी’ परि अवतरते
आठवणींचा ठेवा तुझ्या
मनी सतत घोळतो
आरसा समोर असुनही
तुलाच मी पाहतो
माझाच मी नाही आता
सर्वस्व तूला मानतो
तूझ्या विना मी असा
रात्र रात्र जागतो