Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Dr.GAURI NIRKHEE

Romance

3  

Dr.GAURI NIRKHEE

Romance

चहा

चहा

2 mins
447

रोज सकाळचा सखा सोबती माझा...

गरम गरम वाफाळलेला तो चहा माझा...

सोनेरी सूर्यप्रकाशात चिऊताईची रेलचेल...

'चहा झाला का?'यासाठी अहोंची घालमेल..!

  कधी तू कधी मी अशी चहासाठी बारी असते..

   रोजच्याच चहाला प्रीतीची साथ असते...

   दोन घोट चहासोबत निवांत क्षण टिपायचे..

   सुख दुःखात चहानेच मन मोकळे करायचे...

सवय अशी रोजची चहा करण्याची होऊन जाते..

एकटीच असताना कधी दोन कप चहा करते...

'जिंजर टी','ग्रीन टी','ब्लँक टी' अशी तूझी फरमाईश असते..

तूझ्या या चहासोबत तूझी मिटींग ठरलेली असते..!!

   थकून आलास कधी की चहा हवाच असतो..

    डोकेदुखीवरचा तो जालिम इलाज असतो...!

    मी घरी नसताना माझ्यापेक्षा माझ्या हातचा

     चहाच जास्त आठवतो...!!

'सारेगामा कारवा' वर जुन्या गाण्यांची मैफिल असते..

 टेबलावरचे पेन पेपर लिहण्यासाठी खुणावत असतात..

 तू आयताच आणलेला फक्कड चहा..

  ती मधुर धुंद सकाळ...

  लिखाणाची लज्जत अजूनच वाढवतात..!.

  वाफाळलेल्या चहासोबत काव्य ही स्फुरत जाते..!

   चहाच्या सोबतच आपला दिवस चालू होतो...

    चहाच्या आठवणीतच कधी रममाण होतो...

    एकमेकांना चहा आवडतो म्हणून पसंती दिलेले..

     पहिल्यांदा संवाद चहापासूनच करणारे...

     'कश्मिरी कहावा' असो की 'इराणी चाय'....

     'अमृततुल्य' असो की 'मसाला चाय'...

      साखर आणि चायपत्ती सारखी..#चहा#_#डॉ. #गौरी_निरखी.

      साखर आणि चायपत्तीसारखी..

      कायमची आपली पक्की मैत्री झाली..!!

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance