प्रीती
प्रीती
अनामिक अंतरीची साद.....
दोन मनांचा अंतरीचा संवाद...
प्रीती चिरंतर असता जागॄत ....
मने सुखावतात सतत....
प्रीतीची ओढ असता मनांमध्ये...
सतत संवाद रुंजी घालतो मनांमध्ये...!!
प्रीती असता मनापासून खरोखर...
अंतरीचा साद ऐकू येतो समुद्रापार...!!
भावनांनी जिथे प्रीतीचा धागा बांधला जातो...
तो रेशीमबंध प्रीतीचा सुगंध आयुष्यभर देतो...!!
अबोल प्रीत जेव्हा रुजते मनांमध्ये....
ती प्रीती अमर असते जगामध्ये..!!
प्रीती असते जीवनाचा आधार....
थकलेल्या मनांचा विसावा....!
भरकटलेल्या मनांचा लगाम असते प्रीती...
प्रीती जगण्याची प्रेरणा असते प्रत्येक क्षणी...!
प्रीती असते जीवनाचा श्वास....
प्रेमाच्या नात्यांचा अतूट विश्वास....!
कधी हसू तर कधी नयनी अश्रुंची संततधार...!
प्रीतीचा पसारा श्रावणातल्या सरी....
सरीवर सर बरसते मनांमध्ये प्रीती....!!
प्रीतीची साक्ष नयनांची बोली....<
/strong>
प्रीतीची कबुली गालावरची खळी..!!
प्रीती जपायची असते मनापासून...
प्रीतीच्या रोपट्याला प्रेमाने जोपासायचे..
प्रीतीची संसारवेल हौशीने फुलवायची....!
प्रीतवेल बहरत गेली की आयुष्यभर...
आपण अलगद निसटायचे सुगंध देऊन ...!!
प्रीतीची रोपटे देईल जीवनांना आकार...
प्रीतीची फुले देतील जीवनास आधार....!!
प्रीत ही तूझी आणि माझी प्रीतीची कहाणी निराळी...
सामान्य लोकांच्या असामान्य प्रीतीची कहाणी जगावेगळी...!!
प्रीत ही अनमोल आपली..
प्रीतीची गोड गोड गाणी...!
प्रीत ही आपली...
धरती आणि अंबराची कहाणी...!!
अंधार आणि प्रकाशाची गाणी....!!
प्रीत आपली श्रावणातल्या सरी...
सप्तरंगी इंद्रधनु आपली परीकथेची कहाणी...!!
प्रीत ही प्रीतीने बहरली काळानुरूप अंतरी...
बघ स्मितहास्य खुलले वाचताना तूझ्या गालावरी..!!!
बघ मी टिपले ते हास्य लिहिताना अंतरी...!!
प्रीती.....आपली... जगावेगळी...