पाऊस आणि तू...
पाऊस आणि तू...
पाऊस आणि तू मला नेहमीच सारखे वाटतात...
तो कधी बरसेल याचा नेम नसतो..
तू कधी चिडशिल याचा थांगपत्ता नसतो..!
पाऊस पडताना होतो वीजांचा कडकडाट...
तू चिडताना होतो मेघरुपी शब्दांचा गडगडाट...!
धो-धो एकदाचा तो बरसून जातो...
तू देखील तसाच मनमोकळा होतो...!
पाऊस बरसून गेला की सर्वत्र स्रुष्टी ची नवलाई..
तूझे बरसून झाले की घरात देखील शांताई!!
काय सांगू मना..पाऊस मला फार आवडतो..
त्याचातो गडगडाट, तो बेधुंद बरसतो..!
तू देखील पहिल्या पावसासारखा माझ्या आयुष्यात अवचित आलास...
धरित्रीला ओढ पावसाची..
माझ्या अंतरीला ओढ तुझ्या च प्रीती ची..!!
&nbs
p;नको नको म्हणता आपली प्रीत जडली..
पहिल्या नजरेने आयुष्याची दिशा बदलली...!
कोण म्हणत ठरवलेल्या विवाहात प्रेम होत नसत??
आपल्या उजवल आयुष्यासाठी ते आर्शिवादांच आंदण असत..!
पत्रिका जुळली,किती गुण जुळले याला महत्त्व नसते...
मनांच्या जाणिवांचे नाते आयुष्याभर पुरते...!!
अनोळखी मने कधी एकमेकांची होतात हे कळतच नाही...
पाऊस आणि वीजांसारखा त्यांच्यात फरकच उरत नाही..!!
पतीपत्नीच्या सुर्वणमयी नात्याला प्रीतीची रेशीम गुंफण...
कधी तू पाऊस होऊन धो धो बरसणार...
कधी मी वीज बनून कडकडाट करणार...!!
आयुष्यभर मात्र असेच होत राहणार..##
संसारवेलीच्या आपल्या फुलांनाही तारुण्यात याची जाणिव होणार..!
पाऊस आणि पृथ्वी सम #गौरी _#मंगेश ची जडली प्रीती...
जन्मोजन्मीच्या नात्यांना मिळाली सौभाग्याची पोच पावती....!!★