STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

3  

Mrs. Mangla Borkar

Romance

समृद्धी कोकणाची

समृद्धी कोकणाची

1 min
279

नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत

त्याचा मला अविरत अभिमान आहे


उंच उंच डोंगर रांगा

जणू नैसर्गिकता जपत आहे

रस्तांची नागमोडी वळणे

निसर्गाचा थाट सांगत आहे


खळ खळ वाहती झरे

जसे वाटे सुमधूर संगीत गात आहे

पक्षी करती किलबिलाट

होऊन जाई मन प्रसन्न


हापूस आंबा कोकण भूमीची शान आहे

करवंद, काजू, फणस हे इथे रानमेवा आहे

कोकण भूमी अनेक रत्नांची खाण आहे

विविधतेत एकता ही अनेक दशके टिकून आहे


नैसर्गिक सौंदर्याने नटलेला कोकण प्रांत

त्याचा मला अविरत अभिमान आहे  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance