STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

2  

Mrs. Mangla Borkar

Romance

वात्सल्य प्रेम

वात्सल्य प्रेम

1 min
76


फक्त तू नकोस मला

साथही तुझी हवी आहे

शांत स्थळी एकांतवेळी

प्रीत तुझी हवी आहे


शृंगार प्रेम नको मला

वात्सल्य प्रेम हव आहे

सांजवेळी सूर्यास्ताला

प्रेमगीत हव आहे


दवबिंदू नकोत मला

रिमझिम पाऊस हवा आहे

रानफुलाला सुखावणारा

गार वारा हवा आहे


फक्त शब्द नकोत मला

अर्थ त्यातला हवा आहे

तिमिरातून तेजाकडचा

मार्ग त्यातून हवा आहे


सृष्टी सारी नको मला

द्रुष्टी तुझी हवी आहे

तुझ्या डोळ्यात दिसणारा

विश्वास मला हवा आहे


तुझा दुरावा नको मला

सहवास तुझा हवा आहे

खचनाऱ्या माझ्या मनाला

आधार तुझा हवा आहे  


क्षण तुझे नकोत मला

प्रत्येक क्षणी तू हवा आहेस

वेळ तुझी नको मला     

वेळीस तू हवा आहेस. 


 श्रीमति मंगला बोरकर 

 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance