कौतुक तुझं करावं
कौतुक तुझं करावं
कौतुक तुझं करावं की मनाचं तुझ्या?
समजेना प्रेम कशावर करावं....
तुझ्याशी केलं तर मनाचं काय तुझ्या?
कळेना जास्त कोणावर मरावं.....
सिध्द तुला करावं की हृदयाला तुझ्या?
उमजेना माझं कोण कसं ठरवावं...
तू माझी झाली तर हृदयाचं काय तुझ्या?
कवेत माझिया घट्ट कोणाला करावं...
तन-मन-हृद्याला सलाम तुझ्या?
सुटेना प्रश्न मला मी कुठं ठेवावं...
कसरत होतीय भावनांची आता माझ्या
हृदयी डांबवं की मुक्तहस्ते उधळून द्यावं.....!
(१-०२-१३ | रात्री १०:१६ वा)