साजणी
साजणी
साथ लाभली साजणी
भाग्य माझे उजळले
होता आगमन तुझे
माझे मन बहरले
साथ मिळाली सुंदर
जोडा लक्ष्मी नारायण
सारेजण दाद देती
करुनिया गुणगान
घर प्रसन्न प्रसन्न
बदलले सारेजण
अवलोकन करती
पाहुनिया आचरण
साथ तुझी हवी मला
गोडी असावी जीवनी
साठवूनी मनी सारे
तूच मानिनी कामिनी
हर्ष मनी वाटे मज
भाग्यवान मी संसारी
साथ तुझी हवी हवी
भेट तुझी युगांतरी

