स्वप्न
स्वप्न
पाहिले मी तुला
अन् तू आलीस स्वप्नी
मन बहरून आले
होतं पहाटेच स्वप्न
स्वप्ननगरीतील जणू अप्सरा
बसलो आपण दोघे
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
रममाण झालो आपण
स्वर्गीय सुखाचा आस्वाद
जणू घेतोय आपण
फक्त तुझं नि माझं
दोघांचं जग अजाण
सुरेख चित्र मन
होते रंगवीत माझे
पण पडताच हाक कानी
धाडकन उठलो मी
तारुण्य सुलभ
भावना जाग्या झाल्यावर
पडतात अशीच सारी स्वप्ने
भेटते अप्सरा मनातील