STORYMIRROR

Sanjay Jadhav

Others

3  

Sanjay Jadhav

Others

जीवन

जीवन

1 min
209

जीवन फुलले माझे

जीवन बहरले माझे

जीवन झाले धन्य माझे

जीवन झाले आनंदी माझे


पूर्व जन्माचे संचित जणू

स्वतःला धन्य मी मानतो 

मिळाला जन्म या भूमीत 

मन मायबापाचे जाणतो


केले संस्कार आजोबांनी

बाळकडू संस्कारांचे पाजले

बालपण माझे घडत गेले

जीवनाचे सूर ते जुळले 


न धरावा हव्यास कशाचा

मिळेल त्यात समाधान मानावे

कष्ट करुनी धन कमवावे

जीवनात सदा आनंदी रहावे


घेतला वसा टाकू नये

चांगली सवय मोडू नये

रिकामटेकडं बसू नये

कुणास नावे ठेवू नये 


दिली शिकवण साऱ्यांनी

जीवन माझे घडत गेले

भावनांची जडण घडण झाली

जीवन माझे फुलू लागले


Rate this content
Log in