वाट
वाट
वाट पाहून थकले
बरस रे मेघा लवकरी
वृक्षवेली फार सुकले
पाड जलधारा भूवरी
मी जाहले चातक
करते तुझ्या नामाचा
ध्यास निरंतर रे चातक
हो दास या भूमीचा
दे साद आकाशी
धावत ये तू वेगी
मी मागते तुजपाशी
धाव घेरे तू योगी
मन माझे करी
तुझी रे आळवणी
निसर्गाचा तू सेवेकरी
ठेव नजर पारसमणी
पड रे पाण्या
पड तू लवकरी
झाल्या डोळयांच्या कण्या
दुःख तू माझे दूरकरी
पाहून थकले मी
अंत नकोस पाहू
ठेवीन तुला मी
शिंपल्यात राहू
होता मोती तुझे
पालटेल रूप
आतुरले मन माझे
पाहण्यास स्वरूप