STORYMIRROR

Abasaheb Mhaske

Action Others

4  

Abasaheb Mhaske

Action Others

कविता असते

कविता असते

1 min
27K


 

कविता असते जगण्याचाच भाग 

कविता असते अंतःकरणातील आग 

सभोवताली चांगले वाईट जे काही घडावे 

त्याचेच पडसाद कविमनावर पडावे 

कविता असते भुकेल्याची भूक 

कविता असते भेदक, अचूक 

कविता असते आत्मभान 

कविता असते सामाजिक जाण

कवितेने बंधमुक्त, स्वतंत्र असावे 

कवितेने माझ्या मानवतेचे गीत गावे

कवितेने माझ्या - ह्दयात घर करावे 

कवितेने बहरावे अंगोपांगी ...  

कविता असते आत्मिक सुख 

कविता असते नवोन्मेषशालिनी प्रज्ञा 

कविता इतकी जिवंत असावी की ,

रसिकांच्या रोमा - रोमात भिनावी... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action