STORYMIRROR

Sunetra Gaikwad

Action

4  

Sunetra Gaikwad

Action

मी सहज जिंकला डाव

मी सहज जिंकला डाव

1 min
41.8K


बळीराजा माझे नाव

 हे शिवार माझे गाव

अवरोधांच्या वेसणास

मी तोडिले घालून घाव

    बळी राजा माझे नाव

मीच इथे खडकावरती

घालुुन घाव पिकविले मोती

अन् जागविल्या जीवनज्योती

पांगुळया त्या पंखांनी मग

जिंकला सृजनाचा डाव 

    बळीराजा माझे नाव

तिमिराचा नुरला ठाव

फासाला नाही कुठेही वाव

दुष्काळाशी लढण्याचा

अन् निर्धाराने जगण्याचा

मी सहज जिंकला डाव

   बळीराजा माझे नाव


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action