माझा होशील ना!
माझा होशील ना!
माझा होशील ना!
तू काठोकाठ भरलेला दुधाचा पेला,
मी साखर होवून तुझ्यातं विरघळूनं जाईल.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
होऊ नये,पण कधी झालीचं तुला जखम
तर,होईल रे त्यावर मी मलम.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू आहेस ना रखरखते तापलेले वैशाखातले ऊन,
मी थंडगार वाऱ्याची जुळूक होऊन तुझ्या आयुष्यात येईल ना.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू कप मी बशी,सांडलं काही तुझ्याकडून
तर,ओंजळीत घेईल ह्या बशीच्या सावरून सारं अगदी खुशी-खुशीत.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू अथांग सागर,त्यावर स्वार मी लाट
आदळले कितीही वेळा किनाऱ्याला तरी,
फिरून येईल पुन्हा; कधीचं सोडणारं नाही तुझी पाठ,
शेवटी पडणारच आपली भेट-गाठ.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू आहेस ना रिपरिप श्रावणातली, मी रे गुलाबी थंठी गारव्याची.
मिळेल ना रे ऊब मला तुझ्या प्रेमाची.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू आहेस ना सप्तरंगी इंद्रधनू
मी त्या खालचं क्षितिज,
होईल ना रे आपल्या रे प्रेमाची जीत.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू आळवाचं पान, मी त्यावर
चमकणारा टपोरा पाण्याचा थेंब.
सारं आयुष्य तुझ्या भरवश्यावर
वाहिलेलं.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू जोमात बहरलेल शेतातलं पिक,
मी त्याला राखणं एक बुजगावणं
चालेलं ना रे तुला.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू घोंगावणारं वादळ मी शांत एकांत.
तू चकोर मी चांदणं, पिऊन मला बंद
करशील ना माझं हे गाऱ्हाणं.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू रे उंच शिखर त्यावरून कोसळणारा
मी रे भेसाळलेला धबधबा
.
तू एक्सप्रेस हायवे,मी रे शेतातली
छोटीशी पाऊलवाटं
सोडू नकोसं कधीचं माझी साथ.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू सकाळचं कोवळं-कोवळं ऊन,
मी फटीतून येणार कवडसं,
तुझंचं रे एक रूप.
तू निळशार आभाळ मी त्यातली मुक्त बागडणारी पक्षी.
तू माझाचं व्हावा ही मनावर कोरली मी सुंदर नक्षी.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू देवळातली आत्मिक शांती,मी रे
मधेमधे वाजणारी किणकिण घंटी.
तू देव्हाऱ्यासमोरील सात्विक दिवा
मी रे सुगंधी अगरबत्ती
होईल ना रे आपली गट्टी.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू दिवसभराचं काबाड कष्ट अन
मी शांत झोप तुझ्या रात्रीची.
तू उगवता सूर्य मी रे पहाट
इथूनचं होईल रे आपल्या प्रेमाची सुरवात.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू माझा पती मी तुझी अर्धांगिनी
चालू एकसाथ जन्मोजन्मी सप्तपदी.
तू सुख-समाधानाने भरलेलं माझं घरदारं,
मी अंगणातली रे बहरलेली तुळसं.
राखील पावित्र्य पिढ्यानं-पिढ्या
हाच माझा नवसं.
सांग ना रे,तू माझा होशील ना!
तू 'मी' आहे अन मी 'तू' आहे
हीच आपल्या एकरूपतेची व्याप्ती आहे.
तू शब्द माझे अन मी शब्दांची,
होईल ना पुरी कविता
आपण पाहिलेल्या जीवनाची.
सांग ना रे,तू माझा होशील ना!