चिंब संध्याकाळ
चिंब संध्याकाळ
एक ओली चिंब खिडकितली संध्याकाळ....
पाऊस बरसून गेलेली...
सारी मरगळ विरघळुन गेलेली...
कॉफीच्या मगाच्या तळात....
मावळतीला रात्र उरून राहीलेली
भरून आलेल्या नभाच्या दुलईत लपेटून ....
बैचेन करणाऱ्या पिवळसर संधिप्रकाशातून .....सांडलेले क्षितिज.....
थेंब थेंब पावसाची संथ धुन टिप...टिप...
पानापानातून ओघळणारी....
आणि तृप्त धरणीच्या समाधानाचे उसासे....मातीच्या गंधातुन....
वाऱ्यावर लहरणाऱ्या जगजितच्या गजलेत चिंब भिजुन गेलेले मन
पावसाळी भरात आलेली माझी कविता व्याकरणाचे सगळे नियम तोडून....
तेव्हा आपण भेटु मी तू पणाची सारी बंधने मोडून...