Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Rani More

Romance


3.9  

Rani More

Romance


प्रियकर

प्रियकर

1 min 481 1 min 481

मि अशी चंद्रतारे मोजत असताना

शांतपणे झोप लागेलच कशी तुला ?

कधी आभाळ होऊन समोर येतोस,

तर कधी चंद्राच रुप घेतोस...


मी मोजत रहाते अंतर,

तुझ्या माझ्या मध्ये पसरलेल्या

अमर्याद अवकाशगंगेतलं...


गंधाळुन जाते रात्र जेव्हा,

दरवळत रहातोस श्वासा..श्वासात,

गंधित होऊन

मी हुंगुन पहाते,

खिड़कीतून डोकावण्याऱ्या

रातराणीच्या कळ्या....


अणि अनुभवत रहाते सुगंधी अत्तर

तुझ्या माझ्या मध्ये पसरलेल्या

अमर्याद विश्वासातलं....


कधी नकळत कवटाळतोस मला

एखाद्या हळव्या कल्पनेतून,

रेखाटतोस मला हूबेहुब...


प्रत्येक अक्षरातून,

मग मी जगत रहाते

तुझी हसरी चारोळी होऊन...


बहरुन येते तुझी बहारदार

कविता होऊन

समेवर येते तूझी दिलखेचक गजल होऊन

आणि जग म्हणतं

वेडीच आहे....ही

अशी कशी सजते ही

केवळ शब्दांचा साज लेवुन.....


Rate this content
Log in

More marathi poem from Rani More

Similar marathi poem from Romance