शब्द
शब्द


भेटतील सारेच माझे
शब्द हे माझ्याच आधी
मार्गात तुझ्या मी पेरलेले
आपल्या या भेटीसाठी.
येशील जेव्हा तू इथे
शब्दगुच्छ तोडून घे
अबोल रूसव्याला तुझ्या
शब्दांत तू मांडून घे.
शब्दातच गुंफली मी
विरह वेदनेची व्यथा
शब्दाविना सारेच मग तू
शब्दातूनी जाणून घे
मुक्या साऱ्या वेदना
शब्दात तू मज सांग रे
तुझ्याकरता शब्द माझे
वाट्यास माझ्या मौन का रे?..