STORYMIRROR

Ankita Kulkarni

Romance

4  

Ankita Kulkarni

Romance

प्रेम माझे आणि प्रियाचे

प्रेम माझे आणि प्रियाचे

1 min
1.1K

पहाटवेळी अज भासांचे

    स्पर्श सारखे मला जागवत l


मला वाटते माझ्या प्रियास

    लागला माझं भेटण्याचा ध्यास l


माझ्या डोळ्यांत आज

   अतुरतेचे सारखे भाव तरंगत l


मला वाटते प्रियाच्या नयनास 

     लागली मज भेटण्याची प्यास l


माझ्या मनाला आज 

    प्रियाची साद सारखी ऐकू येत l


मला वाटते बोलवतोय प्रिया

   राहण्यास मज त्याच्या आसपास l


माझ्या हाताला आज होतोय

     स्पर्श सारखा मोरपिसागत l


मला वाटते माझा प्रिया तरोसतय

       माझ्या हाती हात गुंफण्यास l


माझ्या पायाला आज पंख फुटूनी

      भरारी सारखी घेत आहे नभात l


मला वाटते माझ्या प्रियाची आज

    मज भेटण्यासाठी झेप आभाळास l


माझ्या काळजात आज उठतेय

        लाट सारखी तुफानागत l


मला वाटते माझ्या प्रियाच्या

     हृदयात माझ्या मिलनाची आस l


माझ्या श्वासांनी धाव घेतली

      आज सारखी वाऱ्याच्या वेगात l


मला वाटतेय माझा प्रिया 

      आला आहे मज त्या सवे नेण्यास l


माझ्यावरती आज इतके प्रेम

    करतोय मरणानंतर पण अतूट l


मला वाटते माझ्या प्रिया विना

    अर्थ नाही मज या जगण्यास l


आम्ही भेटलो अखेर आज

      पुन्हा पहिल्यासारखे परत l


मला वाटते आम्ही बनलोय फक्त

     जणू एकमेकांसवे राहण्यास ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance