आई
आई
1 min
266
या विश्वाची तू ठेव,
अनमोल, वंदन तुजला करते,
हा देह ठेवूनी तुझ्या चरणांवर।
जन्म मजला तुझ्या,
उदरातून, भुकेने रडू येता,
तुला फुटे दुधाचा पाझर।
झोप येता मजला,
तुझी मऊ मुलायम कुस,
मज जपण्यास तुझा,
डोईवर मायेचा पदर।
घास कालवताना तुझा,
रस प्रेमाचा त्यात, चालताना
लडखडताना तुझ्या ममतेचा आधार।
ठेच मजला लागता तुझे,
तुटते काळीज, उशीर होता मज,
तुझ्या डोळ्यांत दिसे भाव अातुर।
दुःख मजला तुझ्या,
नयनात अश्रू, मायेचा तुझा,
मोरपीसागत स्पर्श माझ्या चेहऱ्यावर।
या विश्वाची तू ठेव,
अनमोल, वंदन तुजला,
वंदन तुजला, वंदन तुजला,
हा देह ठेऊनी तुझ्या चरणांवरll
