STORYMIRROR

Ankita Kulkarni

Others

4  

Ankita Kulkarni

Others

चहा

चहा

1 min
292

पितृ पक्षाचा नात्यांचा मधुर चहा।


मनात सगळ्या सर्व नात्यांना धरून,

सर्वांच्या आदराने आठवण काढत,

मनःपूर्वक नमस्कार करत,

त्यांच्या प्रेमाचे पांढरेशुभ्र दूध घ्या।


आपल्या सर्व सासर-माहेरच्या नाते आहे,

जे आहेत, जे गेले आहेत त्यांच्या सर्वांच्या,

गोड आठवणी काढत त्याच्यामध्ये,

चहाची पावडर टाका।


सर्वांच्या काही कडू आठवणी असतील,

तर त्या सोडून फक्त गोड आठवणी घेऊन,

अशी त्याची प्रेमाची साखर त्याच्यामध्ये मिसळा।


सर्व आपल्या पूर्वजांची, जगात नाही त्यांना, 

जे आहेत त्यांना पण, मनोभावे आदर करून,

सर्वांची आठवण काढून त्यांना,

मनःपूर्वक नमस्कार करत

अशा नात्यांची मधुर चहा पावडर त्यात मिसळा।

 

थोडे आले किसून, वेलची पावडर, जायफळ किसून,

असे नात्यांच्या मधुर गोड प्रेमाच्या आठवणीने त्यात मिसळा,

डोळ्यात थोडे आनंदाश्रू येतील प्रेमाचे,

जायफळ, आले, वेलची, हे सर्व प्रेमाने मिसळा आणि बघा।


असा हा सर्व नात्यांचा आठवणींचा,

गरम गरम वाफाळलेला चहा,

सर्वांच्या आठवणी काढत, सर्वांनी,

मिळून मनसोक्त गप्पा मारत छान प्या।


चहा कोणाला खूप आवडत होता,

ते आता या जगात नाही त्या,

व्यक्तीच्या नावाने थोडासा कावळ्याला,

पण खिडकीत चहा प्यायला ठेवा।


पितृ पक्षाचा स्पेशल चहा कसा वाटला सांगा?


Rate this content
Log in