STORYMIRROR

Ankita Kulkarni

Others

3  

Ankita Kulkarni

Others

सारे आकाश माझे

सारे आकाश माझे

1 min
277

हे सारे विश्व हे सारे आकाश जणू माझेच, मज पोटी,

जन्म घेऊनी एक एक थोर वीर जन्मास आले आहे।


मी गरीब घरातील स्त्री रोज नवीन प्रसंगाला,

तोंड देऊन झगडूनी कुटुंबासाठी रोज नव्याने, 

पुन्हा पुन्हा उभी राहणारी, अशी माझी व्यथा आहे।


कधी मी सामान्य स्त्री बनून न लाजता,

आपल्या लेकरांचे पोट भरण्यासाठी,

लोकांकडे मी धुणी भांडी स्वयंपाक पण करीत आहे।


कोणत्याही कामास न छोटे मानूनी मी न लाजुनी,

खूप मेहनत कष्ट करूनी मी आपुले कर्म करीत आहे।


कधी लोकांच्या बिल्डिंगमध्ये कचरा साफ, 

करूनी त्यांचे कचऱ्याचे डबे पण मी उचलनी नेत आहे।


कधी छोट्या-छोट्या वस्तू घेऊन विकूनी घरोघरी,

जाऊन किती जिने वर-खाली करूनी मी विकते आहे।


कधी रस्त्यावर बसून भाजी पापड लोणची,

पोळी-भाजीचं दुकान तर कधी वडापावची,

गाडी लावून थंडी, ऊन, पाऊस यात मी विकते आहे।


वेळ आली तर आपल्या भुकेल्या लेकरांसाठी,

त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघून,

रस्त्यावर न लाजता मी भीकसुद्धा मागत बसते आहे।


Rate this content
Log in