STORYMIRROR

Ankita Kulkarni

Others

4  

Ankita Kulkarni

Others

दिवस आयुष्याचे

दिवस आयुष्याचे

1 min
436

माझे प्रकाशाकडून,

दिवस चालले अंधाराकडे।


मी बदलवले त्यांनाही,

अंधाराकडून प्रकाशाकडेll


प्रकाशाकडून अंधाराकडे,

दिवस माझे आता चालले।


घर संसारासाठी स्वतःला,

विसरून आयुष्य माझे वेचले।


नवरा-मुलं हेच आपले विश्व,

सतत त्यातच मी रमले।


सतत त्यांना काय हवं नको,

बघण्यात माझे सारे आयुष्य सरले।


मित्र-मैत्रिणी नातेवाईक,

यांना कधी नाही जोडले।


संसाराचे रहाट गाडगं चालण्यासाठी,

नवऱ्याचं आयुष्य त्यात गुंतले।


स्वतःचे अस्तित्व बनवण्यात,

मुलंही भरारी घेत चालले।


अचानक मला एकटेपण,

येऊन ते मला खायला उठले।


वेळ द्यायला माझ्यासाठी,  

वेळच कोणाकडे नाही उरले।


स्वतःलाच धीर देऊन,

उभे राहायचे माझे ठरले।


टेन्शन न घेता आता मस्त,

जगायला हवे असे मला वाटले।


देवाशी भांडण करून त्याच्यावर,

खूप मी रागावले तर कधी चिडले।


मन शांत करून पूजा-अर्चा,

करून ध्यानधारणेत स्वतःला रमवले।


स्वत:च स्वतःची मैत्रीण बनून, 

स्वतःशीच बोलत पण कधी मी राहिले।


सतत नवीन काही शिकत,

स्वतःला शिकवत मनाला गुंतवत राहिले।


एकटीनेच शॉपिंग करून हॉटेलमध्ये, 

जाऊन पिक्चर पण मी पाहिले।


स्वतःलाच काय हवं-नको,

विचारत मी माझेच लाड पुरवले।


एकांतात चित्र काढून रंगवत,

स्वतःची पाठ थोपटत प्रोत्साहन दिले।


गाणे गाऊन स्वतःच टाळ्या वाजवत,

दाद देत माझ्या स्तुतीत मी रमले।


कविता लिहून स्वतःलाच ऐकत, 

स्वतःचीच व्हावा करत बसले।


देवच माझा सोबती पाठीराखा, 

देवळात जाऊन त्याच्या चरणी माथे टेकले।


टीव्ही सिरीयलमध्ये मन रमवत,    

एकटीच कधी खूप हसले तर कधी खूप रडले।


वाढदिवसाला सुट्टीत सर्व घरी एकत्र असे जर,

तर त्या एकेक क्षणांना मी निवडून वेचले।


ते प्रेमाचे अनमोल क्षण गोळा करून,

वेड्या मनाने माझ्या हृदयात त्यांना साठवले।


प्रकाशाकडून अंधाराकडे, 

होते दिवस माझे हे असे चालले।


स्वतःला बदलाऊन त्यांनाही, 

मी अंधारातून प्रकाशाकडे,

चालण्यासाठी वळविलेll


Rate this content
Log in