Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Ankita Kulkarni

Tragedy Others

3  

Ankita Kulkarni

Tragedy Others

खरं

खरं

2 mins
303


आज मला एक ( खरं ) भेटलं,

विचारलं ओळखलस मला ?

मी खरं आहे, खरंच खरं आहे ,

नीट बघ खरं खरं म्हणतात मी तोच रे l

  

मी म्हणले खरंच खरं आहेस ?,

तू खरा आहे का नक्की ते सांग रे,

तू खोटं तर बोलत नाहियेस ना?l

आता माला विश्वास नाही उरला रे l


खरं आणि खोटं यात गुंतलो रे,

याच्या जाळ्यात आम्ही फसलोरे ,

तुझी ओळख आम्ही विसरलो रे ,

तुला ओळखन खूप कठीण झालंय रे l


खोटं खोटं आता यालाच सारे,

आम्हाला खरं खरं असे सांगतात रे,

आम्ही ही त्याला खरं मानू लागलो रे,

खरं, तुझी आता आम्ही ओळख विसरलो रे l


खोट्याला आम्ही खरं खरं ,

समजत आहे कारण आता,

खोटच खरं सांगत आमच्या ,

गळ्यात मारला जात आहे रे l


फळं खाऊन आरोग्य तर म्हणे,

 खूप चांगले राहते हो ना ?,

आता फळ खाऊन सुध्धा,

माणसं किती मारतात रे ,

आम्हाला खूप फसवतात रे l


ताज्या भाज्या खाऊन ,

तब्येत चांगली रहाते ना रे ?

आता भाज्या खाऊन पण,

तब्येत तर खराब होतेच आहे ,

पण मोठे मोठे रोग ही होतात रे l


सर्वांमध्ये भेसळ ,केमिकल,

खोटं जगभर पसरले आहे रे ,

आता डोळेही खरं तुझी ओळख,

पारख करणे सुद्धा विसरले रे l


नवीन बिल्डींग कोसळतात रे,

नवीन पुल बांधले पडतात रे,

सुरक्षित म्हणून ठेवले दागिने,पैसे,

ब्यांका पण आता त्या बंद पडतात रे l


माणसंही चांगले समजून ,

कधी दगा देतात कळत नाही रे ,

अचानक कधी फसवतात रे ,

नंतर अमाचे डोळे उघडतात रे l


खरं प्रेम, खरे मित्र,मैत्रिणी,

सर्वच काही हरवलय आता रे,

तूच सांगणारे आता आम्ही ,

खरं तुला कसे ओळखायचे रे? l


खरं खरं करून कितीतरी,

विकणारे खोटं विकतात रे,

त्यांना त्याचे काही वाटत नाही,

खरं आता सारं विसरून चाललोय रे l


खोट यालाच आम्ही पण,

आता खरा मानु लागलोय रे,

खरंच तू खर हरावलास रे ,

तुला शोधणे खूप कठीण झाले रे l 


खरं तुला कसं ओळखायचं ?

आम्हाला तूच शिकवणा रे ,

आणि तू पुन्हा येणा रे,आम्हाला,

 तुझी खुप खुप गरज आहे रे l


खरं ना फळ,भाज्या राहिल्या,

खरी ना माणसं राहिली,ना नाती,

ना खर ते प्रेम ना ती माणुसकी,

खरं तुझी आता दुनिया संपली रे l


खरं तू पुन्हा नव्याने ये रे ,

तू आमच्याबरोबरच रहा रे ,

साऱ्या जगाला तुझी गरज आहे,

खर्‍याची दुनिया आता तुझ्याच हातात,

तु ती पुन्हा येऊन नव्याने बनवणा रे ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy