STORYMIRROR

Amogsiddh Chendake

Tragedy

4  

Amogsiddh Chendake

Tragedy

जय लोकशाही

जय लोकशाही

1 min
41.7K


दाबा पत्रकारांचा गळा,

काढून घ्या त्यांच्या लेखण्या,

त्यांना डांबा तुरुंगात...

वृत्तपत्र आणि tv चॅनेलच्या मालकांना घ्या विकत

आणि त्यांना ठेवा खिशात.....


जो कोणी सत्तेविरुद्ध बोलेल त्याला टार्गेट करून , घोडा लावा...

लोकशाही म्हणून हुकमशाहीचा फडकवा झेंडा...

बेसुमार बेकारी वाढवून

रेकॉर्ड प्रस्थापित करा...


रस्त्यावर उतरलेले तरुण मरू द्या रस्त्यावरच

झुंडीने दाबा विवेकाचा आणि सत्याचा गळा

प्रसंगी घाला गोळ्या आणि शोधा मारेकरेही तुम्हीच..

संघटनेचं पीक वाढू द्या.. गल्लोगल्ली त्यांच्या मूर्खपणासाहित

तुम्ही सौदे करत रहा मोठ्या भूखंडाचे...


कर्जमाफीचा उत्सव करून

ओरबाडा शेतकऱ्याला त्याच्या जमिनी पिकासाहित..

आणखी मोठे करा उद्योजक... विविध सवलती सेवा देऊन

मोडीत काढा आंदोलने गर्दीत साप सोडून

मोर्चे , आंदोलने पेटतात आणि विझतात

तुम्ही फक्त फेकत राहा आश्वासनाची यादी...


तुम्ही लोकांना शिकवा नीती ,तत्त्व, विचार

आणि तुम्ही लावा नीतीला, तत्त्वाला काळा घोडा...

पक्षात द्या गुंडांना आश्रय...

कमी पडले तर विकत घ्या आमदार खासदार

लोकशाहीच्या अधिकाराने...


दिवसा एकमेकांवर कुरघोड्या करा

आणि रात्री एका ताटात जेवा...

षंढ विरोधक आणि षंढ सत्ताधारी

तुम्ही लावा सुरुंग प्रत्येक गोष्टीला

आम्ही तुमचीच टिमकी वाजवतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy