हो मी स्टंटबाजी करतोय
हो मी स्टंटबाजी करतोय
हो हो कृषिमंत्री साहेब
मी स्टंटबाजी करतोय
धान्याच्या हमीभावासाठी
दरवर्षी रस्त्यावर उतरतोय
भाव नाही धान्याला माझ्या
मी भरघोस पीक पिकवतोय
दुसरा काही उद्योग नाही मला
सार आयुष्य शेतीत घालवतोय
स्टंटबाजी करतो न्यायासाठी
मीडियावर येण्यासाठी नाही ओ
तुमचे सरकार अद्यापही झोपलयं
उठून आमच्याकडे बघत नाही ओ
आकडेमोड करता तुम्ही नुसती
पण खर काही सांगत नाही
आतापर्यंत खुप खोटे बोलले
पण सत्य जगासमोर मांडत नाही
आमच हातावरच पोट ओ
कवडीमोल भावात कस जगायचं
वर्षानुवर्षे संपच करतोय आम्ही
हक्काचं कोणाकडे मागायचं
माय-बाप सरकार तुम्हीच
आम्हा स्टंटबाजी करायला लावता
धान्याला हमी भाव न देता
तुम्हीच जखमेवर मीठ चोळता