STORYMIRROR

Pratik Kamble

Inspirational Children

3  

Pratik Kamble

Inspirational Children

फेरीवाला

फेरीवाला

1 min
13.9K


आई गं बाबा डोक्याला 

कापड का बांधून जातात

का गं आई बाबा असे

गरीबा सारखे राहतात

बाबा कामाला जाताना 

शर्ट पॅन्ट घालत का नाही?

सुट-बुट घालुन बाबा माझे 

ऐटीत चालत का नाही?

लेकरा काय सांगु तुला 

बाबा तुझा कामावर जातोय

काय करणार रे लेकरा 

गरजेनुसार तो राहतोय

उन्हातान्हात फिरावं लागते 

म्हणून कापड डोक्याला बांधतोय

आपले पोट भरण्यासाठी तो 

स्वतःचा कष्टाचा घाम गाळतोय

बरं नक्की सांग बाबा असे 

कोणते काम करतात 

दिवसभर दमुन येऊन ते 

रात्री निपचित झोपतात

किती लपवु तुझ्यापासून

आता तुला सांगुनच टाकते

"फेरीवाला" आहे गं तुझा बाबा

सांगायला मला लाज वाटते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational