लोकराजा राजर्षी शाहु महाराज
लोकराजा राजर्षी शाहु महाराज
लोकराजा शाहुमहाराजांनी
शिक्षण केले मोफत व सक्तीचे
"स्त्री" शिक्षणाचा व्हावा प्रचार
म्हणून पत्र काढले राजाज्ञेचे....१
अस्पृश्यता बंद करूनी
केला जातीभेद दूर
समूळ नष्ट करण्या जातिभेद
आंतरजातिय विवाहाचा कायदा केला मंजूर...२
१९१७ साली पुनर्विवाहाचा
कायदा केला मंजूर
विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता
छत्रपती शाहुंनी केली मंजुर...३
राधानगरी धरण बांधून,
शेतक-यांना कर्ज देवून,
कृषी विकासांकडे लक्ष देवून,
सहकार्य केले विविध उपक्रमातून ...४
बाबासाहेबांना शिक्षण व मूकनायकासाठी
खूप केले सहकार्य.
थोर कल्याणकारी राजा शाहू
फार मोठे त्यांचे कार्य....५
शाहु रयतेचे राजे असूनही
लोकशाही पध्दतीने राज्यकारभार केला
"सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ"
असा बाबासाहेबांनी प्रचार केला....६
१९०२ मध्ये शाहुंनी क्रांतीचा
जाहिरनामा जाहिर केला
मागासवर्गाना ५०%आरक्षण व
राखीव जागा देण्याचा हुकूम केला...७
लोककल्याणकारी राजा शाहू
ठरले भारतातील राज्यकर्ते
आरक्षणाचे जनक तुम्ही
जयंतीदिनी मिनाक्षी अभिवादन करते....