कापूस..!
कापूस..!
कापूस..कापसा..कपासी...!!
कापूस म्हणताच
आम्हाला कापूस कोंड्याची
गोष्ट आठवते
एखादा द्वाड मित्र
वर्गात म्हणायचं
कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का?
सांग म्हंटल की म्हणायचा
सांग काय म्हणतोस
कापूस कोंड्याची गोष्ट सांगू का?
आणि हा न संपणारा खेळ
दिवसेन दिवस
अविरत चालायचा
पण
आज मन टाकलेली
कापसाची शेती पाहिल्यावर वाटत
पावसाची गोष्ट सांगू का?
मन उद्विग्न होतं
आणि वरुणा कडे धाव घेतं<
/p>
आज तेच झालं
वरूणाची करुणा भाकली
आणि त्याने शबफ दिला
म्हणाला
काळजी नको करू
मी येतोय,टाकण्याची गरज नाही
ती हसली आणि जोमाने
आकाशा कडे पाहू लागली
गालात हसली आणि
कानात म्हणाली
मी धीर सोडणार नाही
धन्याला सुखी
केल्याविना राहणार नाही
दोन चार थेंब
दैवाराचे मला तग धरण्यास
खरोखर पुरेसे आहेत
पाऊस येणार
मी खुलणार फुलणार
आणि धन्याला
सुखी करणार
सुखी करणार....!