नितळ...!
नितळ...!

1 min

193
नितळ तुझे वास्तव्य देवा
आज मनास मज भावले
होते नव्हते ते भाव मनीचे
उद्विग्नता सोडुनी निवले....!
तुझ्या दर्शनात देवा
हवे हवे ते सारे मिळते
तुझ्या मैत्रीचे मोल मला
नित्य रे बाबा कळते....!
साऱ्या विश्वाची आग लपेटूनी
तू अस्तचलास रे निवांत जातो
रात्रीचा मग गारवाही आम्हास
तुझी हूर हूर देवा मनास लावतो....!